Font Size
ईयोब 25
Marathi Bible: Easy-to-Read Version
ईयोब 25
Marathi Bible: Easy-to-Read Version
बिल्दद ईयोबला उत्तर देतो
25 नंतर शूहीच्या बिल्ददने ईयोबला उत्तर दिले:
2 “देव राजा आहे.
प्रत्येकाने देवाला मान दिला पाहिजे आणि त्याचे भय बाळगले पाहिजे.
देव त्याच्या स्वर्गीय राज्यात शांती राखतो.
3 कुठलाही माणूस त्याचे तारे [a] मोजू शकत नाही.
देवाचा सूर्य सर्व लोकांवर उगवतो.
4 देवाशी तुलना करता कुठलाही माणूस चांगला नाही.
कुठलाही मनुष्यप्राणी पवित्र असणार नाही.
5 देवाला चंद्र सुध्दा तेजोमय आणि पवित्र वाटत नाही.
देवाच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत.
6 माणसे तर त्याच्या दृष्टीने पवित्रतेत खूपच कमी पडतात.
मनुष्यप्राणी एखाद्या अळीप्रमाणे (मॅगॉट) आहे.
तो कवडीमोलाच्या जंतूप्रमाणे आहे.”
Footnotes
- ईयोब 25:3 त्याचे तारे किंवा “त्याचे सैन्य” याचा अर्थ देवाचे स्वर्गातील सैन्य.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
2006 by Bible League International